मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडतेय. या बैठकील शरद पवारांसह काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेतेही उपस्थित आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळावं, यासाठी अन्य काही कायदेशीर उपाय योजना करणं गरजेचं आहे का? याबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांकडून माहिती घेतली जाणार आहे.