बीड जिल्ह्यामध्ये १८६ गावांच्या निवडणुका होणार असून मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे. आधी आरक्षण द्या मगच निवडणुका घ्या, असे म्हणत माजलगावच्या 19 ग्रामपंचायतींवर मराठा समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील 19 ग्रामंचायत निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार घातला. निवडणूक बहिष्काराचे निवेदन तहसीलदारांकडे देत मराठ्यांनी यावेळी ठिय्या आंदोलन देखील केलं आहे.