मनोरमा खेडकरची चौकशी झाली आणि त्यानंतर आज मनोरमा खेडेकरांना कोर्टात हजर करणार आहेत. महाडमध्ये मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर पोलीस काही वेळात मनोरमा खेडकर यांना घेऊन पौड पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. मनोरमा खेडकर जिच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून ती फरार होती. अखेर पोलिसांनी तिला पकडलेलं आहे.
एका अज्ञात स्थळी अशा ठिकाणी ती जाऊन लपली होती ज्या ठिकाणी जास्त लोक येत नाहीत. तरीसुद्धा पोलिसांनी तिला शोधून काढलं आहे. त्याठिकाणी ती नाव बदलून राहत होती. एका हॉटेलमध्ये ती राहत होती आणि त्याचवेळेला पोलीस तिथपर्यंत पोहोचले. तीची ओळख पटवून तिला अटक केली, ताब्यात घेतलं. पुणे मनोरमा खेडकर यांना वैद्यकीय चाचणी पुर्ण करुन थोड्याच वेळात बाहेर काढणार आणि तिला कोर्टात हजर करणार आहेत.