मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांना जाब विचारला आहे. 40-50 वर्ष जाऊद्या 5 वर्षात काय केल ते सांगा? आमच्या छातीवर बसून दुसऱ्यांना आरक्षण दिलं. आमच्या डोळ्यासमोर 17 ते 18 जातींना आरक्षण दिलं. फडणवीसांनी मराठा समाजाच नुकसान केल असं म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणाच्या भाषणाला जायची गरज नाही कोणाच्या प्रचाराला जायची पण गरज नाही कोणाला घाबरायचं नाही त्यात पण त्या देवेंद्र फडणवीसांना तर अजिबात घाबरायची गजर नाही देवेंद्र फडणवीस पण आपलं काही करू शकत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.