व्हिडिओ

Manoj Jarange Patil : अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांच्या घराची ड्रोनद्वारे टेहाळणी

अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांचे निवासस्थान आहे

Published by : Team Lokshahi

अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांचे निवासस्थान आहे. त्या ठिकाणी अज्ञातांनी ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचसोबतच अंतरवालीतील सरपंचांच्या घराची देखील पाहणी केल्याची माहिती मिळत आहे. ड्रोनद्वारे ही टेहाळणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

येत्या 13 जुलै पासून मनोज जरांगे पाटील आंदोलन पुन्हा एकदा सुरू करणार आहेत असा इशारा त्यांनी दिला आहे तसेच ते लोकांशी संवाद देखील साधणार आहेत. यातच मनोज जरांगे पाटील यांच्या घराची ड्रोनद्वारे टेहाळणी केली जात आहे. रात्रीच्या वेळेस हे ड्रोन सरपंच आणि ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते त्या ठिकाणी पाहणी करत असताना दिसले आहेत. ही ड्रोनद्वारे टेहाळणी नेमकं कोण करत आहे?, कोण मनोज जरांगे पाटील यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महायुतीच्या नेत्याची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; 'या' दोन विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी होणार पास

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला