मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. बेटी बचाव भाजपा हटाव, महिलांचा सन्मान देशाची शान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूरचा निषेध, उलट्या काळजाच्या, थंड रक्ताच्या केंद्र सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणाबाजी दिल्या जात आहेत.