व्हिडिओ

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! लाडक्या बहिणींना 3500, घरगुती वीज मोफत; पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! महिलांना ३५०० रुपये मासिक वेतन, मोफत घरगुती वीज आणि आरक्षणाच्या सुरक्षिततेची हमी. जाणून घ्या अधिक माहिती.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

  2. वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्याचे वचन दिले आहे.

  3. सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांचे मासिक वेतन देण्याचा आणि शेतमाल हमीभाव कायदा करण्याचा प्रस्ताव वंचितने जाहीर केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच आज प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक घोषणा करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना आश्वासंने दिले आहेत.

या जाहीरनाम्यात वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्यात येणार असल्याचं म्हंटलं आहे. तर सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांच मासिक वेतन देण्यात येईल, त्याचबरोबर शेतमाल हमीभाव कायदा करणार असल्याचं देखील वंचितने आपल्या जाहिरनाम्यात म्हंटलं आहे.

Latest Marathi News Updates live : फडणवीस यांची मविआच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

Eknath Shinde Kolhapur Speech | अडीच वर्षात काय केलं? ठाकरेंनी दाखवावं, एकनाथ शिंदेंचं आव्हान

Uddhav Thackeray UNCUT Speech | 'घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर हल्लोबाल | Lokshahi

विरोधकांवर टीका, मधुरिमाराजे यांच्याबद्दल खंत चित्रा वाघ काय म्हणाल्या पाहा...

Devendra Fadnavis On MVA: "पहिला आपलं घर सुधरवा आणि नंतर आम्हाला सांगा" कोल्हापुरच्या सभेत फडणवीसांची मविआवर टीका