नाशिकच्या येवला तालूक्यातील सायगाव फाटा येथे अज्ञात व्यक्तीने मनोज जरांगे यांचा बोर्ड फाडल्याची घटना घडली आहे. नेत्यांना गावबंदी लावलेला हा बोर्ड फाडण्यात आल्याच दिसतात गावात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी गाव बंद करत रस्त्यावर येत निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे नाशिकमध्ये असतानाच हा बॅनर फाडला आहे. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. काही दिवसाच्या अंतराने बोर्ड फाडण्याची ही दुसरी घटना घडली आहे.