राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कुणाकडे दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. हे येत्या दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र जनतेने दिलेल्या अबूतपूर्व यशानंतर शपथविधी सोहळा देखील मोठा व्हावा अशी इच्छा तिन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. त्यामुळे मुंबईत शपथविधी पार पाडण्यासाठी जागा चाचपली जात आहे. भव्य दिव्य असा शपथविधी व्हावा यासाठी सर्वात आधी वानखेडे स्टेडियमचे नाव चर्चेत आहे. येत्या दोन दिवसात वानखेडे स्टेडियम मध्ये हा शपथविधी पार पडू शकतो.