येत्या ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काल बैठक घेण्यात आली. ज्यात औरंगाबाद पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. खरं तर औरंगाबादमध्ये पाणी प्रश्न पेटला होता, भाजपने त्यासाठी आंदोलन देखील केलं होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथं सभा घेतायत म्हणून औरंगाबादेतील पाणीप्रश्न निकाली काढण्यात आला कि काय असा सूर सर्वसामान्यांमध्ये उमटतोय. म्हणजे मुख्यमंत्री जर एखाद्या शहरात जात असतील आणि ते जाणार म्हणून तेथील समस्या सुटणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करायला हवा का? महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाणी, वाहतूक कोंडी, कचरा, गुन्हेगारी, अनधिकृत बांधकामे, चुकलेली नगर रचना या समस्या आहेत आणि त्या सोडवायच्या असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्येक शहराचा दौरा करायला काय हरकत? याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील जनतेचं मत जाणून घेऊयात पाहुयात CM मला तुमच्याशी बोलायचंय.