महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाची सत्ता येईल, कोण मुख्यमंत्री होईल, आणि कोणाला किती जागा मिळतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान, राज्यभरातील राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
एक्झिट पोल्सनुसार, कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येण्याची शक्यता आहे, आणि कोणाचा पराभव होण्याची शक्यता आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत. विशेषतः, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय लढाईकडे लक्ष वेधले जात आहे. तर, जाणून घ्या उत्तर महाराष्ट्रात कोण बाजी मारणार आहे, आणि कुणाची हार होणार आहे.