महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कर्नाटकच्या सीमाभागात बंदी घालण्यात आली आहे. सीमेलगतच्या मराठीबहुल गावांमध्ये न येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांमार्फत तसे महाराष्ट्राला कळवल्याची माहिती बेळगावातील एका कार्यक्रमात सिद्धरामय्या यांनी दिली आहे. सीमाभागात महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मदतीला कर्नाटकचा विरोध दिसून येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये संघर्षाची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने सीमेलगतच्या 865 गावांमधील मराठी लोकांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मदत करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोध केला आहे. सीमेलगतच्या मराठीबहुल गावांमध्ये न येण्याबाबत मुख्य सचिवांमार्फत महाराष्ट्राला कळवल्याचं वक्तव्य त्यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात केलं आहे.