महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि लाचखोरी बोकाळली असून देशात महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि लाचखोरीत अव्वल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षी सर्वाधिक 749 प्रकरणं उघडकीस आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा होणाऱ्यांचं प्रमाणही महाराष्ट्रात अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांत एक हजार लाचखोर आणि भ्रष्टाचारी व्यक्तींविरोधात खटले दाखल झाले. त्यातल्या 44 जणांनाच शिक्षा झाली आहे. बाकी सगळे निर्दोष सुटले किंवा त्यांचे खटले प्रलंबित आहेत. प्रगत महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे का? अशी परिस्थिती आहे.