राज्यात सहा वर्षात 34 गुन्हेगाराचे एन्काऊंटर्स झाले आहेत. बदलापूरमध्ये झालेल्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राज्यात आतापर्यंत झालेल्या एन्काऊंटरची चर्चा आहे. महाराष्ट्र पोलीसांनी 2016 ते 2022 मध्ये एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या जवळपास 34 गुन्हे नोंद केले आहेत. 34 प्रकरणांपैकी 24 प्रकरणे निकाली लागले आहेत तर 10 प्रकरणे अजूनही प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातून 6 वर्षात 34 गुन्हेगारांचे एन्काऊंटर झाले आहेत.