व्हिडिओ

LPG Price Hike : गॅस सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ; जाणून घ्या दर

ऑक्टोबर सुरु होताच महागाई वाढताना दिसत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ऑक्टोबर सुरु होताच महागाई वाढताना दिसत आहे. सामान्यांच्या खिशाला याची चांगलीच कात्री बसणार आहे. ऑक्टोबर सुरु होताच गॅस सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून व्यावसायिक सिलिंडर जवळपास 48 रुपयांनी महागला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. देशात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 1900 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून मुंबईत सध्या गॅस सिलिंडरचे दर 802.50 रुपये आहेत.

ठाण्यात राजकीय पक्षांची उमेदवारी अर्जासाठी लगबग

Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार

Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Special Report | Eknath Khadse | CM Eknath Shinde | शिंदेंच्या टार्गेटवर खडसेंचा बालेकिल्ला

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंसाठी यंदा वरळी कठीण? Vidhan Sabha