तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प गुजरातस्थित राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवण्यास देण्याच्या धोरणावर झालेल्या चौफेर टीकेनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यातील कोणताही दूध संघ पुढे आल्यास त्याला ‘महानंद’ चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर शुक्रवारी संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांची प्रशासक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे.