महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर हिट सुरु झाली असून घामाच्या झळा वाहू लागल्या असतानाच महाराष्ट्रावर लोड शेडींगचं संकट आलेलं आहे. भुसावळीतील दीपनगरमधील कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला आहे. कोळश्याचा मुबलक साठा नसून केवळ २ ते ३ दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. तसेच, चंद्रपूर व कुऱ्हाडी येथील वीजनिर्मिती केंद्रांवर देखील कोळसा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लोड शेडींगच्या संकटाला समोरे जावे लागणार आहे.