कोल्हापूर : कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर लिओनेल मेस्सीला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने काल तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिना विजय झाल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींनी विशेषतः अर्जेंटिना समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे. चाहत्यांनी फटाक्यांची आदेशबाजी आणि हलगीच्या ठेक्यावरती डान्स केला.
फिफा विश्वचषक फायनल मध्ये अर्जेंटिना विजय झाल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींनी विशेषतः अर्जेंटिना समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे. आज कोल्हापुरात अनेक ठिकाणी भल्या मोठ्या स्क्रीन लावून फिफा वर्ल्ड कप अंतिम सामन्याचं प्रदर्शन करण्यात आलं होतं. अनेक तरुण देखील या ठिकाणी सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या फुटबॉल सामन्यात अर्जेंटिनाचा विजय होताच कोल्हापुरातील अर्जेंटिना समर्थकांनी फटाक्यांची आदेशबाजी आणि हलगीच्या ठेक्यावरती जोरदार जल्लोष करत डान्स केला. यावेळी अनेक तरुण बेहोश होऊन जल्लोष साजरा करत होते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडवून नाही म्हणून कोल्हापूर पोलिसांना मोठा केला होता.
दरम्यान, फिफा फायनलमध्ये अर्जेंटिना विरुध्द फ्रान्स सामना रंगला होता. लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले. पण, कायलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने 117 व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यामुळे निर्धारित ९० मिनिटात २-२ असा सामना बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.