माथेरानमध्ये कड्यावरचा गणपती परिसरातील रेल्वे ट्रॅकवर बिबट्या दिसल्याची चर्चा समोर येत आहे. माथेरानच्या डोंगर भागात बिबट्याचे अनेकवेळा दर्शन स्थानिकांना झालेले असून काही शेतकऱ्यांच्या बकऱ्या ह्या बिबट्याने खाल्ल्याने त्याची प्रचिती आहे. सद्या भर दुपारच्या सुमारास बिबट्या दिसून आल्याने पुन्हा एकदा परिसरात चर्चेला उधाण आले असून कड्यावरचा गणपती, पेब किल्ला आदी भागात येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी बाळगावी म्हणून वन विभागा कडून आवाहन केले आहे.