विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तात्पुरता स्थगित करण्यात आलं आहे. एकीकडे लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात असताना दुसरीकडे वाढलेल्या महागाईवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सरकारला टीका केली आहे. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी घणाघाती टीका केली आहे. बहीणींना दीड हजार दिले पण फोडणीला 4 हजार रुपये गेले असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. खाद्य तेल 120रुपया वरुन 155 रुपये झाले तर कांदा बटाटाही दुप्पटीने वाढलेले आहेत अस पेडणेकर म्हणाल्या.