मराठवाडा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतलं जातं. गेल्या काही दिवसात ढासळलेल्या सोयाबीनच्या भावाचा निवडणूक प्रचारात जोर धरतोय. उस्मानाबाद विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाच्या कैलास पाटलांनी सोयाबीन दरावरून भाजपवर खोचक टीका केली. सोयाबीनची पेंड कोंबड्या खातात. त्यासाठी भाजपने ती आयात केली. त्यामुळे सोयाबीनचे भाव ढासळले. ज्या भाजपाला शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या महत्त्वाच्या वाटतात त्यांना मतदान करावं का? असा खोचक सवाल कैलास पाटील यांनी केला. पोल्ट्री व्यवसायिकांच्या दबावाला बळी पडून भाजपने सोयाबीनची पेंड आयात केली. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव ढासळले ही टीका पाटील यांनी केली. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सरकारने अनुदानाची घोषणा केली मात्र प्रत्यक्ष अनुदान मिळालं नाही.