जागा वाटपाच्या आधीच अतुल बेनकेंकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. अतुल बेनके 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अतुल बेनके जुन्नरमधून उमेदवारी दाखल करणार करणार असून अतुल बेनके यांच्याकडे जुन्नरमधून आता जोरदार प्रचार सुरु करण्यात येणार आहे.
याचपार्श्वभूमीवर अतुल बेनके म्हणाले की, परवाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीला दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. हा जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे आम्ही आमच्या कुटुंबाप्रमाणे आम्ही पुढे चालवतो. त्यामध्ये आमच ठरलेलं आहे की, प्रचाराची सुरुवात करायची उमेदवारी जाहीर व्हायची तेव्हा जाहीर होईल.
पण आम्ही निवडणूकीला सामोरे घड्याळ या चिन्हावर जाणारचं आहे. म्हणुन या तालुक्यातले प्रमुख देवस्थान जे आहेत तिथल्या प्रत्येकाचं दर्शन घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. येत्या 28 ऑक्टोबरला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करुन आमच्या निवडणुकीची तयारी पुर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे.