छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासाठी न्यायाधीश रस्त्यावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. रणरणत्या उन्हात पाणीपुरवठा योजनेची पाहणी केल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे, आर एम जोशींकडून योजनेची पाहणी करण्यात आलेली आहे. उन्हाळी सुट्ट्या सुरू असतानाही न्यायमूर्ती ऍक्शन मोडवर दिसून येत आहेत. संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याचे न्यायाधीशांचे आदेश आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी पाण्याची वाणवा आहे आणि काही दिवशी तरी इथे 8-10 दिवसांतून एकदा पाणी येतं. अशामध्ये जी योजना आहे ती का सुरु नाहीये आणि लोकांना का वेळेवर पाणी मिळत नाहीये. असा सवाल उपस्थित केला जात आहे.