जे जे हॉस्पिटलच्या आवारातील वसतिगृहात अंधार झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या आवारातील शासकीय शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाचे ११.५० लाख रुपयांचं वीज बिल थकल्यानं वसतिगृहातील वीज पुरवठा सोमवार सकाळपासून खंडीत करण्यात आला आहे. वसतिगृहातील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यासंदर्भात जे.जे. वैद्यकीय समुहाच्या डीनला विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या संदर्भात विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशीही पत्र व्यवहार केला होता.
शासकीय शिक्षण संस्था ही एकमेव स्वायत्त संस्था महाराष्ट्रात होती. मात्र जेजे प्रशासनाने या संस्थेला डीनच्या अखत्यारीत घेतल्याने प्राचार्यांना अत्यंत छोट्या छोट्या कामासाठी डीनमार्फत सगळे पत्र व्यवहार करावे लागतात अशी माहिती आहे. वसतिगृहातील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.