मराठा आंदोलकांपाठोपाठ आता दुष्काळग्रस्तही आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या जतमध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी तहसीलदारांची ही गाडी फोडली. जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश न झाल्याने दुष्काळग्रस्त नागरिक आक्रमक झाले आहेत. जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची घोषणाबाजी करत तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे.