इस्रोकडून अर्थ ऑब्जर्व्हरवर सॅटेलाईटचं प्रक्षेपण केलं जात आहे. श्रीहरिकोटा केंद्रातून उपग्रह अवकाशात झेपावला आहे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रहाची मदत होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल इस्रोचं म्हणावं लागेल. अर्थ ऑब्जर्व्हर हा अवकाशात झेपावलेला आहे आणि त्याचे एक-एक पार्ट वेगळे होताना दिसत आहेत. मिसाईलच्या माध्यमातून हे सॅटेलाईट सोडण्यात आलेलं आहे.
अर्थ ऑब्जर्व्हर म्हणजेच पृथ्वीवर ज्या हालचाली होत आहेत, त्यांच ऑब्जर्व्हरवेशन या उपग्रहाच्या मदतीने केल आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकलं असच म्हणाव लागेल कारण, भारतामध्ये यावर्षी वायनाडमध्ये भूस्खलन झालं होत, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळाल तसेच बऱ्याच ठिकाणी पूर आलेला होता आणि त्यामुळे अर्थ ऑब्जर्व्हर प्रक्षेपण या उपग्रहाद्वारे आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी भारत एक पाऊल पुढे गेलेला आहे.