त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाच्या दप्तरात कुणबी नोंदी असल्याची माहिती नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे. जरांगेनी पुरोहितांच्या चोपड्यांची पाहणी केली. मनोज जरांगे पाटील ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे . ही माहिती जतन करण्यासाठी शासनाने मदत करावी आणि त्याचा मराठा आरक्षणासाठी उपयोग करावा अशी जरांगे यांनी शासनाकडे मागणी केली आहे.