शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चौकशी होईल असे लातूरमधील कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जनतेची माफी मागतो, चौकशीनंतर आरोपीला योग्य ती शिक्षा दिली जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. हे युवापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. आणि त्या दैवताचा पुतळा अशा पद्धतीने वर्षाच्या आत ज्या पद्धतीने तो पडला हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल तो कोणीही असुद्या वरिष्ठ अधिकारी असुदे, खालचे असुदे, त्यांना काळ्या यादीमध्ये टाकले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.