मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जागावाटप ठरल्याची माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15, काँग्रेस पक्षाला 14, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 7 जागांचं वाटप जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय.लोकसभा निवडणूकीच्या आधारावर फॉर्म्यूला ठरल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं जागावाटप आता निश्चित मानलं जात आहे.
विधानसभेची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि महाविकास आघाडीकडून या संदर्भात चर्चा सुरु झाली आहे. खानदेशातल्या अनेक जागांवर शिवसेना यापूर्वी लढत आली आहे, जिंकलेली आहे. नंदुरबार असेल, जळगाव असेल त्या दृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी बोलू. महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाने कोणत्या जागा लढाव्या याची चर्चा होतच असते असे संजय राऊत म्हणाले.