विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण या निकालाची आतुरतेने वाट बघत होते. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीचं कोल्हापुरात आंदोलन असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली जात आहे. तर नार्वेकरांच्या भूमिकेच्या विरोधात आता काळे झेंडे दाखवत त्यांच्या भूमिकेचा तसेच निर्णयाचा निषेधदेखील करण्यात आला आहे.