ऐन सण-उत्सवाच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. या भाववाढीमुळे सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.
मे महिन्यात सोने 75,100 रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचले होते. नंतर भाव कमी झाले. सोने दरात मंगळवारी पुन्हा 600 रुपयांची वाढ होत ते 75,600रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.
सोन्यासोबतच चांदी देखील प्रतिकिलो 89 हजार 800 रुपयांवर पोहचले असून चांदीतही 300 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एक तोळे सोन्यासाठी 'जीएसटी' सह आता 77,868 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ऐन सण-उत्सवाच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.