मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्याचा झोल समोर आला आहे. फास्टटॅग नसणाऱ्या वाहनधारकांकडून टोलचे पैसे घेत पावतीशिवाय वाहनं सोडली जात असल्याचा हा सगळा प्रकार आहे. टोल कर्मचाऱ्यांकडून बनावट फास्टॅगची एन्ट्री मारली जात आहे. टोलच्या झोलचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागला आहे.
बनावट फास्टॅगची एन्ट्री केली जाते तर सरकारची फसवणूक केली जाते. चांदवड टोल नाका चालविणारे अंश रोडवेज आणि कोरल कंपनी पैशांचा मलिदा लाटत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट फास्टटॅग बनवून शासनाचीच आर्थिक फसवणूक केली जात आहे. आतापर्यंत शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. टोल नाका चालविणारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी आहे.