शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून खेळी खेळली गेली आहे. मुंबई मनपाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई मनपाच्या २५ वर्षांच्या कामांचे ऑडीट करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढताना गेल्या दीड वर्षांतील भ्रष्टाचाराचीही चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. मुंबईत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली 1200 कोटी रुपयांची लूट केल्याचे त्यांनी म्हटले.