मुंबई हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत दिलेल्या आदेशामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र हायकोर्टाने शुक्रवारी काढलेल्या सुधारित आदेशामुळे पोटनिवडणुकीच्या आशा मावळल्या आहेत. आदेशात कोर्टाने म्हटलंय की, पोटनिवडणूक वेळेत झाली असती, निवडून आलेल्या व्यक्तीला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळाला असता, आणि हे प्रकरण आमच्यापर्यंत आले नसते, असं हायकोर्टाने म्हटलंय. त्यामुळे आता पोटनिवडणूक होण्याची चिन्हे मावळली असून, इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.