विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाला आहे. विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यात यावेळी बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळेच, विरारच्या हॉटेलमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
याचपार्श्वभूमीवर हिंतेद्र ठाकूर म्हणाले की, मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल की, विनोद तावडे 5 कोटी घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वाटप आणि मिटिंग घेणार आहेत. मला आधी वाटलं एखादा एवढा मोठा राष्ट्रीय नेता पैसे वाटप करणार नाही. पण आता ते झालं आहे पण एक नियम आहे 48 तास अगोदर दुसरे मतदारसंघ जोडायचे एवढा साधा नियम राष्ट्रीय सरचिटणीसांना माहित नसावा का? का ते मुद्दाम वाडा आणि इकडे पैसे वाटप करण्यासाठी आले आहेत.
हे धंदे कधी बंद करणार हे लोक? माझ्या कार्यकर्त्यांनी आधी पाहिल ते आणि मग मी आलो माझ्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. आता मला विनोद तावडेंचे 25 फोन आले आणि मला विनंती केली जात आहे की झाली चुक सोडून द्या माफ करा. यांच्या डायरी आणि लॅपटॉप पण इथे आमच्याकडे आहेत.