व्हिडिओ

Hingoli : हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळा बनल्या धोकादायक

हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळांची धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क स्वत:चा जीव धोक्यात घालून शाळेत शिक्षण घ्यावं लागत आहे.

Published by : Team Lokshahi

गजानन वाणी, हिंगोली|

हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळांची धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क स्वत:चा जीव धोक्यात घालून शाळेत शिक्षण घ्यावं लागत आहे. शाळेतल्या भिंतींना तडे गेलेले असून वर्गखोल्यांना गळती लागली आहे, त्यामुळे वर्गात पाण्यासाठी टोपली मांडावी लागली आहेत. छत कोसळ्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून या शाळेत सत्तर विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ दोनच वर्गखोल्या असून त्याही वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. याच शाळेतील एक वर्गखोली मागील काही दिवसांपूर्वी कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी अनेक वेळा नवीन वर्गाची मागणी शिक्षण विभागाकडे केली मात्र शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे..

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result