हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हैदोस पाहायला मिळत आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे पुराच्या पाण्यात 18 ते 20 जण अडकलेले आहेत तसेच काही जनावर देखील अडकलेले दिसून येत आहेत. कळमनुरीतील देवजना शिवारात रात्रीपासून शेतकरी पुरात अडकलेले होते. तर मुसळधार पावसामुळे हिंगोलीत पाणी शिरलं आहे. पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी त्याठिकाणी रेसक्यू टीम आणि प्रशासन पोहचलेलं आहे.