हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये शिरलेलं आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तर मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरात पाणी शिरलंआहे. तसेच शहरात पाणी शिरल्यानं 400 ते 500 नागरिक अडकले असल्याची बातमी समोर आली आहे.
पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिकांना घराच्या छताचा आधार घ्यावा लागतं आहे. हिंगोलीच्या खानापूर शिवारात 5 ते 6 नागरिक अडकल्याची नातेवाईकांकडून माहिती माहिती मिळाली आहे.