मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सब-वे परिसरातील दुकानांमध्येही पाणी शिरलं आहे. उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सब वेमध्ये देखील पाणी साचले असून वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेट लावून नागरिकांना आणि वाहनांना सब वेतून जाण्यास मनाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पूलाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.