Hasan Mushrif team lokshahi
व्हिडिओ

Pune : ईडी कारवाईमुळे ब्रिक्स इंडिया कंपनी वादात

ईडीच्या कारवाईमुळं वादग्रस्त ठरलेल्या एका कंपनीवर महायुती सरकार मेहेरबान झालं आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे : ईडीच्या कारवाईमुळं वादग्रस्त ठरलेल्या एका कंपनीवर महायुती सरकार मेहेरबान झालं आहे. ब्रिक्स इंडिया नावाच्या कंपनीला सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलमध्ये जेवण पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. ही कंपनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांशी संबंधित आहे. या संदर्भातला जीआरही काढण्यात आला आहे.

ब्रिक्स कंपनीवर मुश्रीफांच्या सरसेनापती साखर कारखान्यात मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणात कंपनीच्या कार्यालयांवर आणि संचालकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले होते. त्यामुळं ब्रिक्स कंपनीचं ग्रामविकास विभागातील कंत्राटही रद्द करण्यात आलं होतं. आता त्याच कंपनीवर सरकार कसं मेहेरबान झालं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news