भारत विरुद्ध पाकिस्तान टी20 विश्वचषक सामन्यात भारतानं 4 विकेट्सनी विजय मिळवला. संपूर्ण जगाचे लक्ष आजच्या या हाय होल्टेज सामान्याकडे होते. पराभव होता होता सामना भारताने आपल्याकडे ओढला. या सामन्यात हार्दिक पांड्यानं बॉल आणि बॅट दोन्हीने कमाल केल्याचं पाहायला मिळालं. आधी गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्यातर फलंदाजीत महत्त्वूपूर्ण 40 रन केले. पण या विजयानंतर मात्र हार्दिक कमालीचा भावूक झाल्याचं दिसला. सामना जिंकल्यानंतर तो मैदानातच ढसाढसा रडला. त्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील त्याला असं रडताना पाहून भावुक होत आहेत.
यावेळी रडताना हार्दिकने त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आणि केलेल्या बलिदानाची आठवण केली. त्याच्यासाठी ते एका शहरातून दुसरीकडे गेले. तो स्वत:ही एक बाप आहे मुलावर खूप प्रेम करतो पण घरातल्यांनी केलेलं बलिदान खूप मोठं होतं असं पांड्या व्हिडीओत म्हणाला.