या राज्यातील प्रत्येक घटक शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, तरुण, ज्येष्ठ सर्व समाजातले घटक या सगळ्यांना मी या होळीनिमित्त शुभेच्छा देत आहे. त्यांच्या जीवनामधीत देखील बदल घडू द्या. त्यांचं जीवन सुखाचं समाधानाचं होऊ द्या. त्याचप्रकारचं राज्य सरकारचं काम सुरु आहे. राज्य सरकारने अनेक निर्णय या सर्व सामान्याचे लोकांचे गेल्या दीड पावने दोन वर्षात घेतले आहे.
राज्य आणि केंद्र सरकार देखील आदरणीय मोदी साहेब देखील या देशासाठी 10 वर्ष असं काम केलं आहे. म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याच्या आम्ही चांगला विकास करतो आहे. आणि म्हणूनच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही होळी अतिशय पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगांचा उधळण करा. आज राजकारण नको आज फक्त होळी साजरी करुया आपण आज सगळे या होळीमध्ये मित्रही गळे-भेट करतात आणि शत्रूही गळे-भेट करतात. त्यामुळे आज राजकारण विरळीत होळी साजरी करुया.