मराठा आरक्षणावर टांगती तलवार आहे. भरती, शैक्षणिक दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून राहतील. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत. आरक्षणविरोधी याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे निर्देश दिले आहेत. मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.