सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात परप्रांतीय लोकांकडून जमीन विकत घेऊन आजूबाजूच्या ग्रामस्थांना धमकावल जात. पोलिस संरक्षणात जमीन मोजली जाते. स्थानिकांचा दबावाखाली ठेवलं जातं. प्रशासन धनदांडग्या लोकांच्या पाठीशी राहते, असा आरोप स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सक्त ताकीद दिली. तर जिल्हाधिकाऱ्यावर सुमोटो मी स्वतः दाखल करून असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकत नसाल तर प्रशासनात राहायचा अधिकार नाही असं म्हणत पोलीस अधीक्षकांना देखील खडेबोल सुनावले आहेत.