राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान उत्साहात पार पडलं. आज मतमोजणीनंतर गावचा कारभारी ठरणार आहे. काही तुरळक घटना वगळता राज्यातल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी मतदान झालं. तर गावचा कारभार हाकण्यासाठी थेट जनतेतून 2 हजार 489 सरपंच निवडले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.