राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल आज दिल्लीत परिषेदमध्ये सहभाग नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 2 ते 3 ऑगस्टला राज्यपाल परिषद पार पडणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या उपस्थितीत पहिल्याच राज्यपाल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये सर्व राज्यांतील राज्यपालांसोबत उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व इतर महत्त्वाचे मंत्री व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.