व्हिडिओ

Gopal Shetty | उपाध्याय - शेट्टींचे समर्थक आमनेसामने; गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया काय? | Lokshahi

गोपाळ शेट्टी यांना भाजपकडून डावलून संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शेट्टींचा नाराजीचा सूर; बोरिवलीत अपक्ष निवडणुकीची तयारी.

Published by : shweta walge

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना डावलून संजय उपाध्याय यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने गोपाळ शेट्टी कमालीचे नाराज झाले आहेत. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना डावलून पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. आणि आता विधानसभेत सुद्धा उमेदवारी डावलल्यामुळे गोपाळ शेट्टी आता बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. 'निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असून पक्षाने केलेली चूक आपण दुरुस्त करत आहोत' अशी खरमरीत प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे. 'संजय उपाध्याय यांच्या बद्दल आपलं वाईट मत नाही. आणि मी पक्ष सुद्धा सोडलेला नाही. मात्र वारंवार माझ्यासोबत अशाप्रकारे वर्तणूक झाल्यामुळे आपण हे अपक्ष निवडणूक लढवण्याचे पाऊल उचलले असल्याचे गोपाळ शेट्टी सांगत आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी