राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झालेली आहे. जुलैच्या वेतनात हा हफ्ता मिळणार आहे. जानेवारी ते जूनची थकबाकी आता जुलैच्या वेतनात दिली जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनात महागाई भत्त्याचा दर 46 वरून 50 टक्के करण्यात आला आहे. मागील 6 महिन्यांच्या थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात हा वाढीव महागाई भत्ता रेखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.