गोंड गोवारी जमातीच्या आंदोलकांचं आंदोलन सुरुच आहे. आंदोलनकर्त्यांकडून शहर बस सेवा ठप्प करण्यात आली आहे. शहरातील पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वेरायटी चौकापासून ते संविधान चौकापर्यंत आदिवासी गोवारी बांधवांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. नागपूर शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सगळी कडे ट्रॅफिक जाम झाले आहे. सकाळपासून गोंड गोवारी समाजाचे आंदोलक यानी रस्ते रोखून धरले आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळे नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश सुद्धा नागपूरला आले असतांना ते सुद्धा वाहतूक ठप्प झाल्यानं अडकून पडले आहे. ठिक ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने शहारत वाहतूक बंद पडली आहे.