दिवाळीत सोने-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या भावात 15 दिवसात 5 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या भावात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराई सुरू झाली आहे. सोनं स्वस्त झाल्याने पिवळ्या धातुत गुंतवणूक करणाऱ्यांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.